राष्ट्रीय रोजगार हमी कायद्यासाठी हजारो अंगणवाडी महिला, युवक, विद्यार्थी आणि कामगारांनी केला संसद भवनाला घेराव !
देशभरातील बेरोजगारीच्या समस्येशी झुंजणाऱ्या हजारो युवक-कामगार-महिलांनी केंद्र सरकारकडे ‘भगत सिंह राष्ट्रीय रोजगार हमी कायदा’ पास करण्याची मागणी करत भव्य मोर्चाचे आयोजन केले. रोजगार अधिकाराला मूलभूत अधिकारांमध्ये सामील करण्यासाठी गेल्या एक वर्षापासून देशाच्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये नौजवान भारत सभा, दिशा विद्यार्थी संघटना, बिगुल मजदूर दस्ता, दिल्ली स्टेट अंगणवाडी वर्कर्स अॅंड हेल्पर्स युनियन आणि विविध जनसंघटनांच्या बॅनरखाली ‘भगतसिंह राष्ट्रीय रोजगार हमी कायदा’ अभियान चालवले जात आहे. आज याच अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये रामलीला मैदानावरून हजारोंच्या संख्येने एकत्र होऊन दुसऱ्या ‘रोजगार अधिकार मोर्चा’ची सुरुवात झाली.